Nagpur News: सध्या सगळीकडेच गुन्हेगारीचे (crime news maharshatra) प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे परत एकदा समाजात भितीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. नुकतीच एक घटना घडली आहे ज्याने देह विक्री आणि व्यापार आणि त्यातून होणारी हिंसा, गुन्हेगारी याचा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो आहे. नागपूर येथे सुरू असणारे सेक्स रॅकेट (sex racket) उघडकीस आले आहे. या प्रकारानं नागपूर (nagpur crime news) येथील रामदासपेठ आणि सोनेगाव रोड हा परिसर हादरून निघाला आहे. यातून तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात दोन हॉटेल्स (hotels) येथे कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या या केसबद्दल पोलिसांनी कडक कारवाई करण्यासही सुरूवात केली आहे. (nagpur news police caught two hotelers for running sex racket)
शहरातल्या पॉश समजल्या जाणा-या रामदासपेठ आणि सोनेगाव रोड येथील दोन हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून तिथून चालणाऱ्या देहव्यापाराचा भांडाफोड केला आहे. सीताबर्डी पोलिसांनी या दोन्ही कारवाया केल्या असून समीर आणि जोसेफ कुट्टी या दोन आरोपींना अटक केली आहे .तर तीन मुलींची सुटका केली आहे.सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देहव्यापार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रामदासपेठ येथील ऑक्टेव्ह पार्टक्लॅंड सुट्स (OCTAVE partkland suites) येथे हा देहव्यापाराचा काळाधंदा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी सापळा रचला.तिथे पंटर पाठवला.त्याने तिथे शहानिशा केली. त्यानंतर पंटरने इशारा दिल्यानंतर पोलिसांनी स्टाफ सह या हॉटेलवर रेड टाकली.
हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
तिथे त्यांना आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या. यावेळी पोलिसांनी तिथून दोन पीडित मुलींची सुटका केली. यावेळी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी हॉटेल फ्लोरा ईन सोनेगाव रोड नागपूर येथेही देह व्यापार चालत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल फ्लोरा इन येथे छापा टाकला. आणि तिथून एका मुलीची सुटका करण्यात आली. दोन ठिकाणाहून एकूण तीन मुलींची सुटका करण्यात आली.याप्रकरणी पोलिसांनी आ समीर आणि जोसेफ कुटी या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक 498 /22 कलम 370 34 भादवी सह कलम 3,4,5,7 पीटा ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी जोसेफ कुटी वय 32 वर्ष जरीपटका येथील रहिवासी आहे.
नागपूर विद्यापीठात प्राध्यापक विरोधात लैंगिक छळाची (Sexual abuse) तक्रार असल्याची भीती दाखवून काही प्राध्यापकांची फसवणूक (fraud) करत त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली. यात खंडणी मगितल्याचा आरोप असलेल्या जनसंपर्क विभागाचा साह्यक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांना या प्रकरणातील पीडित प्राध्यापकाचा पत्नीने कानशिलात लागावली.
''माझ्या पतीची पाच लाखांची फसवणूक केली त्यांनी जर तणावात आत्महत्या केली असती तर माझे पती वापस आणून दिले असते का? असा संतप्त सवाल केला. मात्र हा वाद सुरू असताना पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. हे सुरू असताना संतापलेल्या महिलेने (woman beats a man) मात्र धवनकरांच्या कानशिलात लावली. तोच म्हणत मला दोन झापडा मारा असाही उल्लेख आहे. या प्रकरणात विद्यापीठाकडून (university) अद्याप कुठलीही प्रतिक्रिया समोर आली नाही.