नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढणार ?

नागपूर अधिवेशनाचा कालावधी अजून वाढवावा अशी मागणी विदर्भवादी नेते चंद्रकांत वानखेडे यांनी केली. 

Updated: Dec 7, 2017, 09:50 AM IST
 नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढणार ? title=

नागपूर : नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. करारानुसार हे अधिवेशन किमान चार किंवा तीन आठवड्याचे असयला हवे मात्र आजवरचा इतिहास पाहता नागपूर अधिवेशन हे सहसा दोनच आठवड्याचे राहिले आहे.

वानखेडेंची मागणी

मात्र दोन आठवड्यात विदर्भात होणाऱ्या या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळत नसून नागपूर अधिवेशनाचा कालावधी अजून वाढवावा अशी मागणी विदर्भवादी नेते चंद्रकांत वानखेडे यांनी केली. अजूनतरी हि मागणी पूर्ण झाली नाही.

१० दिवसाचे कामकाज 

अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधी सभागृहात कमी व सभागृहाच्या पायऱ्यांवर अधिक दिसत असल्याची टीकाही वानखेडेंनी केलीये.

२८ नोव्हेंबरला विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला.

११ ते २२ डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे...दोन आठवड्याचे अधिवेशन असले तरी प्रत्यक्ष १० दिवसच हे कामकाज चालणार आहे.

प्रस्ताव मांडणार 

 पुरवणी मागण्या,त्यावर चर्चा,मंजुरी व २१ तारखेला अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

हा कालावधी विदर्भातील मुद्दे,प्रश्न,समस्या व त्यावरील उपायोजना करिता कमी पडत असल्याचे सत्ताधारी भाजपचे आमदार डॉक्टर मिलिंद मानेंनी सांगितले.