रत्नागिरीत नगरपंचायत निवडणूक : शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीत खरी लढत

गुहागर आणि देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालीय.

Surendra Gangan Updated: Apr 11, 2018, 09:24 AM IST
रत्नागिरीत नगरपंचायत निवडणूक : शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीत खरी लढत title=

रत्नागिरी : गुहागर व देवरुख नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गुहागरमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे शिवसेना व शहरविकास आघाडी युती या तिघांनीही नगरपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, ही निवडणुक अत्यंत चुरशीची होणार असल्याने, गुहागर पोलिसांनी गुहागर शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवला असून, नगरपंचायत प्रशासनाने  आजच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. गुहागर आणि देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालीय. गुहागरमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस त्याप्रमाणे शिवसेना-शहरविकास आघाडी युती आहे.

निवडणूक अत्यंत चुरशीची होणार

नगरपंचायत क्षेत्रात प्रत्येक प्रभागात १ याप्रमाणे १७ प्रभागांमध्ये मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी ९ इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. निवडणुकीला ५ हजार ८३७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, १७ जागांसाठी ४२ उमेदवारांचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा खर तर या ठिकाणी पणाला लागली आहे.ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 

इतके लोक मतदानाचा हक्क बजावणार

तर देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी ९ हजार ८६४ मतदार आपल्या मतदानाचा आज हक्क बजावणार आहेत.  एकूण १७ केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देवरूख निवडणूक विभाग व देवरूख पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी संपूर्ण देवरूख शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तब्बल ८० पोलीस नाक्यानाक्यावर तैनात करण्यात आले आहेत. 

या निवडणुकीत ५ हजार ८३८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी 9 हजार 864 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवक पदासाठी ६१ उमेदवार उभे आहेत. 

नगराध्यक्ष पदाकरिता हे उमेदवार

नगराध्यक्ष पदाकरिता काँग्रेस - राष्ट्रवादी - बहुजन विकास आघाडी - कुणबीसेना व जनता दल या पक्षांच्या आघाडीकडून स्मिता लाड, भाजपा- मनसे - आरपीआय या युतीच्या मृणाल शेट्ये, शिवसेनेकडून धनश्री बोरूकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून मिताली तळेकर व अपक्ष म्हणून अनघा कांगणे असे ५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर नगरसेवक पदासाठी ६१ उमेदवार उभे आहेत.