अमरावतीमधील घटनेनंतर खळबळ! पती-पत्नीला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न

Crime News: मेळघाटात (Melghat) जागेच्या वादातून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. यावेळी दगडाने ठेचून पती पत्नीला जीवे मारण्याचा (Attempt of Murder) प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  

Updated: Feb 11, 2023, 10:42 AM IST
अमरावतीमधील घटनेनंतर खळबळ! पती-पत्नीला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न title=

अनिरुद्ध दवाळे, अमरावती 

Crime News: महाराष्ट्रातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीत (Amravati) पती-पत्नीला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt of Murder) करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ (Video) समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

नेमकं काय झालं?

अतिदुर्गम मेळघाटात (Melghat) भावकीच्या जागेच्या वादातून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली भावकीच्या जागेचं वाटप (Land Controversy) न केल्याने दगडाने ठेचून पती व पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार यावेळी समोर आला आहे. मेळघाटातील काटकुंभ चुर्णी येथे हा सगळा प्रकार घडला. 

हल्ल्यात पती पत्नी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.  अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी चौघांविरोधात चिखलदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.