.... सगळंच संपलं ! धडधड येणाऱ्या रेल्वेसमोर जाण्यापूर्वी पाहा हा विचलीत करणारा VIDEO

Youth dies in train accident at Mumbra : रेल्वेने प्रवास करताना तुम्ही सावधान असले पाहिजे. कधी कधी एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. असाच एक प्रसंग मुंब्रा रेल्वे स्थानकावर घडला.  

Updated: Sep 22, 2022, 04:09 PM IST
.... सगळंच संपलं ! धडधड येणाऱ्या रेल्वेसमोर जाण्यापूर्वी पाहा हा विचलीत करणारा VIDEO title=

धुळे : Youth dies in train accident at Mumbra : रेल्वेने प्रवास करताना तुम्ही सावधान असले पाहिजे. कधी कधी एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. असाच एक प्रसंग मुंब्रा रेल्वे स्थानकावर घडला. या प्रसंगाचा व्हिडिओने अंगावर काटा उभा राहतो.

धुळे जिल्ह्यातील विजयी गावातील तरुणाचा मुंब्रा रेल्वे स्थानकावरती रेल्वेच्या धडकेमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून, या अपघाताची दृश्य समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाले आहे. 

वडजाईचा तरुण हा सैन्य भरतीसाठी मुंब्रा येथे केला होता. त्यावेळी त्याची अचानक तब्येत खालावल्याने त्याला ओमीटचा त्रास जाणवला, तात्काळ तो ओमीट करण्यासाठी रेल्वे मार्गाच्या ट्रॅककडे धावला. त्याचदरम्यान कानावरती हात ठेवून ओमीट करत असतानाच, वेगवान रेल्वेने त्याला धडक दिल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. 

प्रकृती खराब झाल्याने त्याला रेल्वे येत असल्याचं लक्षात आलं नाही आणि या दुर्दैवी अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाचे देश सेवेचे स्वप्न अपूर्ण राहिले, त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केला जात होती.