Mumbai Police : दिवाळीत घातपाताची शक्यता; मुंबई पोलिसांकडून अलर्ट, 15 दिवस जमावबंदी लागू

Alert issued by Mumbai Police : ऐन दिवाळीच्या सणात दहशवादी हल्ल्याची शक्यता असून खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील घातपाताच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Updated: Oct 21, 2022, 02:43 PM IST
Mumbai Police : दिवाळीत घातपाताची शक्यता; मुंबई पोलिसांकडून अलर्ट, 15 दिवस जमावबंदी लागू  title=
संग्रहित छाया

 Mumbai imposed section 144 across the city for 15 days: ऐन दिवाळीच्या सणात दहशवादी हल्ल्याची शक्यता असून खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Alert issued by Mumbai Police) मुंबईतील घातपाताच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांकडून अलर्ट  

मुंबईत शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता आहे. यामुळे मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका असल्याने पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. दिवाळी सण असल्याने बाजारपेठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. यामुळे गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.( Mumbai Police Alert)

1 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पाच माणसांपेक्षा जास्त माणसांना एकत्र येण्यास मुंबईत मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीत फिरण्यासाठी बाहेर पडत असाल तर तुम्हाला आता काळजी घ्यावी लागेल.