Mumbai Local News Update: 12 सप्टेंबर 2023 रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रवास खडतर होणार आहे. मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळं दिवाळीत नातेवाईकांकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. (Mumbai Local Train Update)
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान रविवारी दिवसा मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळं मुख्य मार्गावरील धीम्या आणि हार्बर मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. पश्चिम रेल्वेनेही शनिवारी मध्यरात्री 12.15 ते रविवारी पहाटे 4.15 पर्यंत ब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळं रविवारी कोणताही ब्लॉक नाहीये. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आलं आहे. रविवार असल्याने अनेकजण नातेवाईंकाकडे भेटीगाठी घेण्यासाठी जातात. मात्र, दिवाळी असूनही मध्य रेल्वेने याच दिवशी मेगाब्लॉकचे आयोजन केले आहे. त्यामुळं प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलं आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहारदरम्याम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळं काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही विलंबाने धावणार आहेत. देखभाल आणि दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घोषिक करण्यात आला आहे. मात्र सणासुदीच्या दिवसांत ब्लॉकचे आयोजन केल्याने प्रवाशांना नाहक त्रास होणार आहे.
स्थानक : सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग : अप आणि डाऊन धीमा
वेळ : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५
परिणाम : धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही फेऱ्या रद्द, तर काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम : सीएसएमटी/वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान अप-डाऊन आणि सीएसएमटी ते वांद्रे गोरेगावदरम्यान अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहे. पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.