भीषण अपघातात ५ ठार आणि ६ जण गंभीर जखमी

 बस -आणि क्रुझरमध्ये हा अपघात झाला

Updated: Jun 23, 2018, 03:10 PM IST
भीषण अपघातात ५ ठार आणि ६ जण गंभीर जखमी title=

मुंबई : मुंबई -आग्रा महामार्गावर शिरवाडे फाटा येथे भीषण अपघात झालाय. बस -आणि क्रुझरमध्ये हा अपघात झाला असून ५ ठार आणि ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुपग्णालयात उपचार सुरू आहेत. आग्रा महामार्गावर  चांदवड - पिंपळगाव  दरम्यान शिरवाडे फाटा येथे बस व क्रुझर वाहनांमध्ये झालेल्या  भीषण अपघातात  6 जण ठार तर  सहा ते आठ जन गंभीर जखमी झाले आहेत. एका विवाह सामारंभानिमित्त  सटाना तालुक्यातील किकवारी  ग्रामस्थ  पिंपळगाव  जात असताना शिरवाड़े  फात्यावरील  धोतरखेड़े शिवारात  क्रुझर गाडीचा टायर  फुटून  गाडी  डीवायडर तोडून  दुसऱ्या बाजूने  येणाऱ्या बसवर धडकली.  मृतांमध्ये 5 महिला व 1 पुरुषाचा सामावेश आहे . जखमीवर  पिंपळगावच्या खासगी रुग्णालयात  उपचार सुरु आहे.