लाचखोर तहसीलदाराकडून पासबुक, पासपोर्ट जप्त

 सचिनच्या चाव्या, पासबुक आणि पासपोर्ट देखील जप्त 

Updated: Dec 30, 2018, 11:01 PM IST
लाचखोर तहसीलदाराकडून पासबुक, पासपोर्ट जप्त  title=

पुणे : लाचखोर तहसीलदार सचिन डोंगरेकडून लॉकरच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. जमिनीच्या वारसा नोंदीच्या प्रकरणात निकाल देण्यासाठी आणि फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाकडून 1 कोटीची लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईनंतर डोंगरे विरूद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लवासा रस्त्यावर "एसीबी'च्या पथकाने ही कारवाई केली. त्याच्या अडचणीत अधिक वाढ होताना दिसत आहे. सचिनच्या चाव्या, पासबुक आणि पासपोर्ट देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पुणे एसीबीने दिली आहे.

मोठं घबाडं ?

सचिन डोंगरे हा पुण्यातील मुळशीचा तहसीलदार आहे. वारस  नोंद लावण्यासाठी त्याने एक कोटीची मागितली होती. लाच स्वीकारताना त्याला लवासा रोडवर रंगेहाथ पकडण्यात आले होते. लॉकरच्या चाव्या आणि बँकांची काही पासबुक मिळाल्यानं डोंगरे कडून मोठं घबाड जप्त होण्याची शक्यता आहे. सचिन डोंगरे मूळचा सोलापूरचा आहे. त्याच्या पुण्यातील आणि सोलापूरच्या घरी देखील एसीबीने झडती घेतली आहे.