खासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी

उदयनराजे भोसलेंनी शेअर केली फेसबुक पोस्ट 

Updated: May 30, 2020, 04:30 PM IST
खासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी  title=

मुंबई : शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, मनोरुग्ण तसेच अनाथांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अक्षयने फेसबुक लाईव्हद्वारे माहिती देताना जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर यासंदर्भात आरोप केले आहेत. या लाईव्हमध्ये त्याच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. या घटनेचा खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र निषेध केला आहे. 

कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाने याप्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करुन या तरुणाला न्याय मिळवून द्यावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य बेघर, मनोरुग्ण, अनाथ लोकांचे मनोभावे संगोपन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वताचे आयुष्य वाहून घेणारा जुन्नर तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधार देणारा युवक अक्षय बोऱ्हाडे याला काही राजकीय लोकांकडून बंदुकीचा धाक दाखवून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य बेघर, मनोरुग्ण, अनाथ लोकांचे मनोभावे संगोपन करून त्यांना समाजाच्या मुख्य...

Posted by Chhatrapati Udayanraje Bhonsle on Wednesday, May 27, 2020

सामाजिक जीवनात काम करत असताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो हे सर्वज्ञात आहे, परंतु कोणी राजकीय द्वेष तसेच वैयक्तिक कारणास्तव याप्रकारचे हल्ले करत असेल तर हे हल्ले महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीस नक्कीच विचलीत करणारे असतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Posted by Akshay Mohan Borhade on Wednesday, May 27, 2020

अक्षय बोऱ्हेडचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अक्षयने आपल्याबरोबर नेमकं काय झालं हे सांगितलं आहे.