सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याना अटक करण्यात आली आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी करून कायदेशीर अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पोलीस जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर उदयनराजे भोसले यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं उदयनराजेंनी आवाहन केलं आहे.
तत्पूर्वी उदयनराजे समर्थक आणि सातारकरांकडून बाजार पेठेसह शहरातील दुकाने उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आली आहेत. कॉ. नाना पाटील रुग्णालय, पोवईनाका आणि शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. एका उद्योगजकाला खंडणी मागितल्याप्रकरणी उदयनराजेंवर गुन्हा झाला होता. त्यावर कोर्टानं त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात चार महिन्यानंतर उदयनराजे साता-यात दाखल झाले.