Sanjay Raut On Ajit Pawar : संजय राऊत यांचे अजित पवार यांना प्रत्युत्तर, म्हणाले - विश्वासूंकडूनच...

Sanjay Raut News : शिवसेनेतल्या फुटीवरुन  विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना नेतृत्वाला जबाबदार धरल्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ( Maharashtra Politics News)  

Updated: Feb 4, 2023, 10:51 AM IST
Sanjay Raut On Ajit Pawar : संजय राऊत यांचे अजित पवार यांना प्रत्युत्तर, म्हणाले - विश्वासूंकडूनच... title=
Sanjay Raut On Ajit Pawar

Sanjay Raut On Ajit Pawar : शिवसेनेतल्या फुटीवरुन राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना नेतृत्वाला जबाबदार धरल्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ( Maharashtra Politics News) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गाफील नाही तर त्यांनी आपल्या विश्वासूंवर अधिक विश्वास दाखवला, असं राऊत यांनी म्हटले आहे. विश्वासूंकडूनच विश्वासघात होतो, असं राऊत म्हणाले. (Maharashtra Politics News in Marathi)

शिवसेनेतल्या फुटीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेतल्या फुटीची कल्पना उद्धवजी यांना सहा महिन्यांआधीच दिली होती. मात्र आमदारांवर डोळे झाकून विश्वास ठेवला तिथेच गफलत झाल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. तर गृहखातं तुमच्याकडे होतं. तुम्ही बंडखोरांना पकडून ठेवायचं होते, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. 

संजय राऊत पुढे म्हणाले, नागपूर आणि अमरावती दोन जागा आम्ही जिंकल्या. कारण आम्ही एकीने लढलो. आता कसबा, चिंचवडची जागा महाविकास आघाडी एकत्र लढेल. उद्धव ठाकरे यांनी विश्वासातील लोकांवर जास्त विश्वास ठेवला आणि त्याच लोकांनी ठाकरे यांचा विश्वासघात केला. त्यांची संस्कृतीपेक्षा विकृती अधिक आहे.

राणे यांच्या विधानाला काही आधार नाही. राणे यांनी जे दावे केले आहेत, त्याचे उत्तर त्यांनी आता कोर्टात द्यावे. मी नारायण राणे यांच्याविरोधात कोर्टात बदनामीची केस दाखल केली आहे. आमचा न्यायवस्थेवर विश्वास आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.