शासकीय रूग्णालयात आणखी सलाईनच्या बाटलीत शेवाळ

काही दिवसांपूर्वी बीडमध्ये सलाईनच्या बाटलीत शेवाळ आढळल्याची घटना ताजी असताना आता

Updated: Jan 30, 2020, 05:28 PM IST
शासकीय रूग्णालयात आणखी सलाईनच्या बाटलीत शेवाळ title=

पुणे : काही दिवसांपूर्वी बीडमध्ये सलाईनच्या बाटलीत शेवाळ आढळल्याची घटना ताजी असताना आता पुण्यातील मंचर येथील जिल्हा उपरुग्नालयात सलाईनच्या बाटलीतही शेवाळ आढळलेत. हे सलाईन RL कंपनीचे आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी ही बाब डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली आहे. 

या घटनेनं जिल्हा आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडालीय. ग्रामीण भागातील नागरिक मोफत आणि चांगले उपचार मिळतील या आशेनं गोरगरीब शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतात. मात्र त्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.