राज्यात तिसऱ्या दिवशीही 8 हजाराहून अधिक रुग्णांची वाढ

. लागोपाठ तिस-या दिवशी राज्यात 8 हजाराहून अधिक रुग्ण वाढले 

Updated: Feb 26, 2021, 09:03 PM IST
राज्यात तिसऱ्या दिवशीही 8 हजाराहून अधिक रुग्णांची वाढ title=

मुंबई : राज्यात शुक्रवारी 8 हजार 333 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. लागोपाठ तिस-या दिवशी राज्यात 8 हजाराहून अधिक रुग्ण वाढले आहेत. दिवसभरात राज्यात 48 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राजधानी मुंबईत 1 हजार 34 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत देखील लागोपाठ तिस-या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या हजाराहून अधिक आहे. राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 67 हजार 608 वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ४ हजार 936 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

दुसरीकडे मुंबईत सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आज धारावीत १६ कोरोना रूग्ण मिळाले असून येथील अॅक्टीव्ह कोरोना रूग्णांची संख्या ५१ वर पोहचली आहे. आतापर्यंत १ अंकी संख्येत रूग्णवाढ होत होती. पण आज रुग्ण संख्या दोन अंकी झाली आहे.

दादरमध्ये आज कोरोनाचे १५ रूग्ण वाढले असून अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. माहिममध्ये १३ रूग्ण वाढले आहेत. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. धारावी सारख्या भागात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ निश्चितच चिंता वाढवणारा आहे. 

राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबईसह इतर शहरात देखील रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

इतर बातमी: कोरोनामुळे प्रसिद्ध गायकाचं निधन, चाहत्यांवर शोककळा