दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून राज्यभर सक्रीय होणार

मान्सूनने राज्याचा ८० टक्के भाग व्यापला असून येणा-या दोन ते तीन दिवसानंतर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागातही मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

Updated: Jun 16, 2017, 07:49 PM IST
दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून राज्यभर सक्रीय होणार  title=

मुंबई : मान्सूनने राज्याचा ८० टक्के भाग व्यापला असून येणा-या दोन ते तीन दिवसानंतर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागातही मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली ,सातारा,सोलापुरातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.  सध्या विदर्भातील यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा आणि मराठवाड्याच्या ब-याचशा भागात मान्सून सक्रीय झाला आहे. अरबी समुद्रात पुन्हा मान्सून सक्रीय होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असल्यानं मुंबईसह कोकणात दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.