कोकणात मान्सूनपूर्व पाऊस

कोकणात आज दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाने अनेकांची धावपळ उडाली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 30, 2017, 05:51 PM IST
कोकणात मान्सूनपूर्व पाऊस title=
देवरुख येथे असा पाऊस बरसला (छाया सौजन्य - नितीन हेगशेट्ये)

मुंबई : कोकणात आज दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाने अनेकांची धावपळ उडाली. 

रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. रत्नागिरी, देवरुख आणि दापोली शहरात दुपारी दमदार पावसांची हजेरी लावली. गेल्या चौविस तासात जिल्ह्यात 2 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. 

गेल्या चौविस तासात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झालाय. इथं 9 मिलिमिटर पावसाची नोंद झालीय. आज सकाळ पासून ढगाळ हवामान होते. उकाडा वाढला असतानाच भर दुपारी अचानक ढग दाटून आले आणि शहरातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ या ठिकाणी पाऊस पडला. सावंतवाडीत चांगला पाऊस झाला. त्यामुळे येथे हवेत गारवा निर्माण झालाय. अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग वाढल्याने मान्सूनपूर्व सरी पुढील काही तासात कोसळतील असा अंदाज मुंबई वेधशाळेने व्यक्त केला होता. त्यामुळे  मान्सून सक्रीय होण्यासाठी कोकणात पोषक वातावरण निर्माण होते आहे. आज पडलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे.