मुंबई : परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांना झोडपून काढले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आदी भागात जोरदार पावसाने शेतीचे मोठे नुकासना झाले. आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी राजावर पुन्हा संकटाचे ढग असल्याची भीती व्यक्त होत आहे.
1.30 pm, 24 Oct.
Convective thunderstorm clouds development observed over parts of Pune, Satara, Raigad, Ratnagiri. Possbility of TS in these areas in next 3,4 hrs. Take care.
पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी मेघगर्जने सह पावसाची शक्यता पुढच्या 3,4 तासात.
काळजी घ्या.@RMC_Mumbai pic.twitter.com/JefjpErxHz— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 24, 2020
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा कोकणातील रायगड, रत्नागिरीत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढच्या तीन ते चार तासांत हा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या, असा इशारा हवामान विभागाच्यावतीने देण्या आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाची माहिती दिली आहे.
Conditions becoming favourable for withdrawal of Monsoon from northern parts of Maharashtra during next 48 hours.
Thunderstorm warnings continuing over parts of Konkan, Madhya Mahrashtra and Marathwda during next 2-3 days. pic.twitter.com/vjcp8UwZ1B
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 24, 2020
येत्या ४८ तासात मान्सूनची उत्तरेकडील भागातून माघार घेण्यास अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत येत्या दोन ते तीन दिवसात वादळाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अधिक दक्ष राहावे लागणार आहे.