चटका लागला म्हणून खिशात हात घातला अन् तेवढ्यात फोनने पेट घेतला; नागपुरातील घटना

Nagpur Mobile Blast: पँटच्या खिशातल्या मोबाईलने अचानक पेट घेतला. हाताला गरम वाटू लागल्याने फोन बाहेर काढला तितक्यात फोनने पेट घेतला. नागपुरात ही घटना घडली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 28, 2023, 01:47 PM IST
चटका लागला म्हणून खिशात हात घातला अन् तेवढ्यात फोनने पेट घेतला; नागपुरातील घटना title=
mobile phone exploded in youthtrouser pocket in nagpur

Nagpur Mobile Blast: गेल्या काही दिवसांपासून मोबाइल फोनचा स्फोट होण्याच्या घटना वाढल्याचे समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. तरुणाच्या खिशातच मोबाईलने पेट (Mobile Battery Blast) घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रोशन कळवदे असं तरुणाचे नाव आहे. (Nagpur News Today)

पॅन्टच्या खिशात ठेवला होता फोन

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे राहणाऱ्या तरुणाने पॅन्टच्या खिशात मोबाईल ठेवला होता. त्यावेळी अचानक फोनला आग लागली. सुदैवाने यात रोशनला कोणतीही इजा झाली नाही. रोशन कामानिमित्त रामटेक येथील किंमतकर दवाखान्यात गेले होते. त्यावेळी मोबाइल अचानक गरम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ खिशातून फोन काढून जमिनीवर फेकला. तोवर मोबाईलने पेट घेतला होता. 

खिशातून फोन काढताच घेतला पेट

रोशन यांच्या वेळेतच मोबाईलने पेट घेतल्याचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रोशन यांच्याकडे Redmi note 9 हा अँड्रॉइड हँडसेट हा. फोन खिशात असतानाच अचानक गरम होऊ लागला. याची जाणीव होताच त्याने तात्काळ मोबाईल खिशातून काढून जमिनीवर फेकला. मात्र फोन जमिनीवर फोन फेकत असेपर्यंत मोबाईलने पेट घेण्यास सुरूवात केली होती. आग वाढून अचानक मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटात मात्र कोणतीही हानी झाली नाही. 

गंभीर इजा होण्याची शक्यता

दरम्यान, याआधीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. मोबाईलच्या स्फोटात गंभीर ईजा होण्याचीही शक्यता असते. आज चिमुरडी मुलं ही मोबाइल हाताळताच या आधी घडलेल्या काही प्रकरणांमध्ये मुलांच्या हातात मोबाईलचा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळं बालकांना गंभीर इजादेखील झाली आहे. पण असे का घडतं यांचा गंभीरपणे विचार करण्याचे गरज आहे. 

मोबाईलचा स्फोट होण्याची प्रमुख कारणे

मोबाइलचा स्फोट होण्याचे प्रमुख कारण म्हणजे बॅटरी खराब होणे. डॅमेज बॅटरीमुळं मोबाईलचा स्फोट होऊ शकते. नादुरुस्त बॅटरीमुळं मोबाईल ओव्हर हिट होतो त्यामुळं शॉर्टसर्किट होण्याचा धोका अधिक असतो. बॅटरी शॉर्ट सर्किट झाल्यामुळं ती फुगते. त्यामुळं बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. 

बॅटरी खराब होण्याचे दुसरे कारण म्हणजे मोबाईल चार्ज करताना ओरिजनल चार्जरचाच वापर करावा. डुप्लिकेट कंपनीचे चार्जर वापरल्यास बॅटरीच्या आतील पार्टसना धोका पोहोचू शकतो.