मतदान केंद्रांवर मोबाईलबंदी फक्त कागदावरच?

मतदानकेंद्रात मतदान करतानाचं मोबाईल शूटिंग

Updated: Apr 30, 2019, 08:10 PM IST
मतदान केंद्रांवर मोबाईलबंदी फक्त कागदावरच? title=

मुंबई : निवडणूक आयोगानं मतदान केंद्रांवर मोबाईलबंदी केली होती. पण ही मोबाईलबंदी फक्त कागदावरच पाहायला मिळाली. नाशिक आणि अंबरनाथमध्ये मतदानकेंद्रात मतदान करतानाचं मोबाईल शूटिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथमधील प्रसिद्ध उद्योजक डीएम भोईर यांनी मतदान केंद्रात मतदान करताना आपला व्हिडिओ काढल्याचा दावा करण्यात आला आहे. यात त्यांनी कोणत्या उमेदवाराला मतदान केलं हे देखील स्पष्ट दिसतं आहे. त्यांच्या या कृतीमुळे गुप्त मतदान पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

हा व्हिडियो आपला नसून एडिट केल्याचा दावा भोईर यांनी केला आहे. दुसरीकडं मोबाईल बंदी असतानाही दिंडोरी मतदारसंघात मतदान करतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. दिंडोरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांना मतदान केलं जात असल्याचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जातं आहे.