नवी मुंबईत मनसे कार्यकर्ते आक्रमक, फेरीवाल्यांना दिला चोप

मुंबईतल्या मालाड येथे फेरीवाल्यांनी मनसे कार्यकरत्यांना केलेल्या मारहाण प्रकरणाचे पडसाद नवी मुंबईतही उमटले.

Updated: Oct 29, 2017, 09:02 PM IST
नवी मुंबईत मनसे कार्यकर्ते आक्रमक, फेरीवाल्यांना दिला चोप  title=

मुंबई : मुंबईतल्या मालाड येथे फेरीवाल्यांनी मनसे कार्यकरत्यांना केलेल्या मारहाण प्रकरणाचे पडसाद नवी मुंबईतही उमटले.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

मनसेच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईतल्या वाशी रेल्वे स्थानकाबाहेरच्या अनधिकृत फेरीवाल्यांना पळवून लावलं. तसंच त्यांच्या सामानाची तोडफोडही केली.

यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थाळी दाखल झाले. या घटनेनंतर फेरीवाल्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर बेकायदेशीर फेरीवाल्यांना विरोध सुरुच ठेवणार असल्याचा इशारा मनसेनं दिलाय.

या प्रकरणी रविवारी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मनसेवर हल्ला चढवला.

संजय निरुपम पत्रकार परिषद मुद्दे:

  • विनापरवानगी मोर्चा काढून प्रक्षोभक भाषण करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, पण गृहखाते पाहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने माझ्यावर मात्र गुन्हा दाखल होतो
  • मनसेचे नेते फेरीवाल्यांकडून हफ्ते घेतात, योग्यवेळी नावे जाहीर करेल
  • माझे लोकांना आवाहन आहे की मनसेची गुंडगिरी संपवण्याची हीच योग्य वेळ आहे 
  • नितेश राणे कुठल्या पक्षात आहेत हे आधी त्यांनी ठरवावं. मी लहान मुलांच्या आरोपांकडे लक्ष देत नाही
  • मी फेरीवाल्यांकडून हफ्ता घेतो हे कुणी पुराव्यानिशी सिद्ध केल्यास मी राजकारण सोडून देईन
  • मोकळे पदपथ हा नागरिकांचा हक्क, पण रोजीरोटीही तेवढीच महत्वाची
  • लोकांच्या हक्काचे मोकळे भूखंड शिवसेना-भाजपने लाटले
  • द्वेष, आणि हिंसाचाराच्या राजकरणामुळे लोकांनी मनसेला नाकारलं. पक्ष रिकामी झाला हे राज ठाकरे यांनी आता तरी लक्षात घ्यावं
  • जखमी मनसे कार्यकर्त्याची प्रकृती लवकरात सुधारावी ही ईश्वर चरणी प्रार्थना, पण त्या कार्यकर्त्याना देव सुबुद्धिही देवो
  • मुंबईत एकही फेरीवाला अनधिकृत नाही. कायदा बनलाय. पण सरकारला त्याला मंजुरी द्यायची नाहिये. फेरीवाल्यांवर होत असलेली कारवाई चुकीची असल्या प्रकरणी ११२ प्रकरणे न्यायालयात सुरु आहेत. न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली आहे. तरीही न्यायालयाचे आदेशा अवमान करीत महापालिकेची कारवाई सुरू आहे.