MLA Ramesh Bornare : शिंदे गटाच्या आमदारानं घातली पोलिसांशी हुज्जत, Video आला समोर!

Aurangabad News: औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात बैठक पार पडली. ही बैठकीसाठी आलेले शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचं पहायला मिळालं. 

Updated: Jan 25, 2023, 06:56 PM IST
MLA Ramesh Bornare : शिंदे गटाच्या आमदारानं घातली पोलिसांशी हुज्जत, Video आला समोर! title=
mla ramesh bornare

Ramesh Bornare Video: शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात (Eknath Shinde) सहभागी झालेले आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी हिंगोलीत राडा घातला होता. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होताना दिसतोय. अशातच आता शिंदे गटाच्या आणखी एका आमदाराचा (MLA Ramesh Bornare) व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (MLA Ramesh Bornare argument with Aurangabad police due to blocking the car marathi news)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज औरंगाबादच्या (Aurangabad News) दौऱ्यावर होते. फडणवीस यांच्या उपस्थितीत आज औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात बैठक पार पडली.  ही बैठकीसाठी आलेले शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी गाडी अडवल्याने  पोलीस आणि बोरनारे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

पाहा Video -

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पुढे येऊन हस्तक्षेप केला आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. इतर आमदार यांच्या गाड्या सोडल्या जात आहेत. फक्त माझीच गाडी का अडवली जातीये?, असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण दिसत होतं.

आणखी वाचा - Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी 100 वर्षांची परंपरा मोडली? ग्रामस्थ चिडले आणि...

दरम्यान,  शिंदे गटातील आमदारांना कायद्याचा धाकच उरला नाही का? असा सवाल उपस्थित केला जातोय. संतोष बांगर यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारवर टीका केली जात होती. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. त्यानंतर आता शिंदे गट आमदार रमेश बोरनारे यांच्या अरेरावीवर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.