आमदार धीरज देशमुख थेट ऊसाच्या मळ्यात : पाहा व्हिडीओ

शेतातला माणूस शेतातच रमला 

Updated: Jan 14, 2022, 08:26 AM IST
आमदार धीरज देशमुख थेट ऊसाच्या मळ्यात : पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा पसरत आहे. अनेक राजकारणी व्यक्ती कोरोनाबाधित होत आहे. असं असताना लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुक्त झाल्यावर आमदार धीरज देशमुख यांनी पहिलं काम जे केलंय ते पाहून सगळ्यांनाच सुखद धक्का बसला आहे. 

धीरज देशमुख कोरोनामुक्त झाल्यावर पहिलं शेत गाठलं आहे. 'शेतामंदी मन रंगल' म्हणत धीरज देशमुख यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या मुलांसोबत ऊसाच्या मळ्यात छान ऊसाचा आनंद घेतला आहे. 

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'शेतामंदी मन रंगल... कालच कोरोनामुक्त झालो.  दिवसाची सुरूवात मुलांसोबत शेतात केली. शेतात जाऊन ऊसाचा आनंद लुटला... ' म्हणत या #SimpleJoysOfLife #Happiness #FarmerForLife #Gratitude हॅशटॅगचा वापर केला आहे. 

कोरोनाकाळ नाही म्हटलं तरी प्रत्येकासाठी खूप कठिण असतो. कोरोनाकाळात सगळ्यांना सोडून एकट राहणं हे प्रत्येकाला त्रासदायक असतं. मुलं, घर, कुंटुंब या सगळ्यागोष्टी याकाळात आपण मिस करत असतो. अशावेळी कोरोनामुक्त झाल्यावर धीरज देशमुख यांनी मुलांची पहिली भेट घेतली. मुलांना घेऊन त्यांनी थेट आपलं शेत गाठलं. ज्या शेतात धीरज देशमुख यांनी आपल्या मुलांसोबत ऊसाच्या मळ्यात वेळ घालवला. 

हाच सुंदर क्षण त्यांनी 'शेतात मन रमलं' या पोस्ट अंतर्गत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पकंजा मुंडे आदींना कोरोना झाला आहे. हे सर्व उपचार घेत आहेत.

राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दुसरीकडे मुंबई व ठाणे येथील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना पुन्हा एकदा डोकं वर करत आहे. 

राज्यात गेल्या 24 तासात महाराष्ट्रात एकूण 46 हजार 406 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल बुधवारी 46 हजार 723 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 32 जण कोरोनामुळे दगावले होते.