महाराष्ट्र हादरला! मुलीची छेडछाड काढणाऱ्यांना जाब विचाराला, त्याच तरुणांकडून आईची हत्या

Minor girl molested in Beed : संताप आणि चीड आणणारी बातमी. बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  

Updated: Aug 3, 2022, 12:13 PM IST
महाराष्ट्र हादरला! मुलीची छेडछाड काढणाऱ्यांना जाब विचाराला, त्याच तरुणांकडून आईची हत्या title=

बीड : Crime News : Minor girl molested in Beed : संताप आणि चीड आणणारी बातमी. बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीची छेडछाड केली म्हणून याचा जाब आईने विचारला. त्यानंतर छेडछाड काढणाऱ्या तरुणांनी आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. ही घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली.

बीड जिल्ह्यातील वानटाकळी तांडा येथील अल्पवयीन मुलीची छेडछाड करुन त्रास देणाऱ्यांना जाब विचारल्यामुळे मुलीच्या आईचा तिक्ष्ण हत्याराने भोकसून खून करण्यात आला. फरार दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आणि परळी तालुक्यातील मौजे वानटाकळी तांडा येथील एक कुटुंब आठ दिवसापूर्वी बालाजी देव दर्शनाला गेले असता त्यांच्या तीन मुली काळवटी तांडा येथे वास्तव्यास होत्या. याच तांड्यावरील बबन चव्हाण याने त्यांच्या अल्पवयीन मुलीस विनाकारण भेटून छेडछाड करत त्रास दिला.

आई वडील देवदर्शनावरुन परत आल्यानंतर होत असलेला प्रकार या अल्पवयीन मुलीनी आपल्या आई वडिलांना सांगितला. आई-वडिलांनी दोन दिवसापूर्वी बबन चव्हाण यास जाब विचारला. त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याचा राग मनात धरुन काल बबन चव्हाण त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण भाऊ सचिन चव्हाण यासह इतर तिघांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन भांडण करण्यास सुरुवात केली. अधिक मारहाण होऊ नये म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी त्यास खोलीमध्ये कोंडून दरवाजा लावून घेतला. त्यावेळी आरोपींनी दुसऱ्या रुममध्ये असलेल्या मुलीच्या आईकडे मोर्चा वळवून त्यांच्या पोटात तिक्षण हत्यारांनी वार करुन आणि डोक्यात लाकडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.

आरडाओरडा पाहून शेजारी धावून आले तेव्हा मारहाण करणाऱ्या आरोपींनी पळ काढला. गंभीर अवस्थेतील पीडीत मुलीच्या आईला उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान या घटनेने नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिलेत. त्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी चार - पाच पथके निर्माण करुन मुख्य आरोपी बबन चव्हाण आणि त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. आणखी इतर चार आरोपी लवकरच ताब्यात घेतले जातील, अशी माहिती वासुदेव मोरे यांनी दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.