'ते' तर राजकारणात अजूनही नवखे.. अशोक चव्हाण म्हणतात आता तर त्यांची..

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजप खासदारांनी केलेल्या त्या टीकेला उत्तर दिलंय. 

Updated: Mar 28, 2022, 06:57 PM IST
'ते' तर राजकारणात अजूनही नवखे.. अशोक चव्हाण म्हणतात आता तर त्यांची..  title=

उस्मानाबाद : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलंय. अशोक चव्हाण यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतलं. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतात चव्हाण यांनी चांगलाच टोला लगावलाय. 

भाजप खासदार सुजय विखे यांनी काल राज्यातील काँग्रेस बिनलाजे झाले आहे. शिवसेना मुक्या बायकोच्या भूमिकेत तर राष्ट्रवादी त्रास देणाऱ्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे, अशी टीका केली होती.

त्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केलीय. ज्या काँग्रेस पक्षावर ते टीका करत आहेत. त्याच काँग्रेस पक्षात त्यांचे कुटुंब अनेक वर्ष होते. त्यामुळे त्यांनी टिका करण्यापेक्षा सकारात्मक भूमिका घ्यावी.

सुजय विखे हे राजकारणात अजून नवखे आहेत. राजकारणात आता तर त्यांची सुरुवात झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. अशोक चव्हाण यांच्या या टीकेनंतर विखे विरुद्ध काँग्रेस हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.