योगेश खरे, झी मीडिया
Nashik News Today: गायीचे दूध हे शुद्ध आणि पौष्टिक असते. गायीचे दूध म्हणजे संपूर्ण कुटुंबीयांसाठी विशेषतः लहान मुलांसाठी पोषक असते. मात्र, आता गायीच्या दूधातही आता भेसळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या निफाडमध्ये बनावट दूध विकले जात असल्याचे समोर आले आहे. एका तेल सदृश्य पदार्थांपासून बनवले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील बागायतदार परिसर असलेल्या निफाडमध्ये 97 प्रशासनाने टाकलेल्या छाप्यामध्ये 420 लिटर गायीच्या दुधासह साडे पंधरा हजारांचा मिसळ युक्तसाठा जप्त केला आहे. (Nashik Cow Milk Adulteration)
निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात कातकडे मळा येथे भेसळ दुध तयार होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळताच या पथकाने धाड टाकत एका दुधाच्या प्लास्टिक कॅनमध्ये भेसळयुक्त दूध आढळून आले. अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यामध्ये डेअरी परमीट पावडर १८ किलो, व्होल मिल्क पावडर ३४ किलो, तेलसदृश पदार्थ १७० लिटर व वरील पदार्थांची भेसळ करून बनविलेले ४२० लिटर गायीच्या दुधाचा साठा विक्रीसाठी तयार करण्यात आला होता. सदर सर्व साठ्यातून अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत डेअरी परमीट पावडर १६ किलो किंमत २२४० रूपये, व्होल मिल्क पावडर ३२ किलो किंमत ७६८० रूपये, तेलसदृश पदार्थ १६८ लिटर किंमत २५७०४ रूपये व भेसळयुक्त गाय दूध ४१८ लिटर किंमत रूपये १२,५४०/ असा एकूण ४८,१६४ रूपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. बनावट गायीचे दुध हे भेसळयुक्त व नाशवंत असल्याने कोणीही सेवन करु नये त्यामुळं आरोग्य मानवी सेवनास येऊ नये या उद्देशाने जागेवरच नष्ट करण्यात आले आहे.
दुध पावडरचे पुरवठादार हेमंत पवार, शहा,पंचाळे, ता. सिन्नर व तेल सदृश पदार्थ सिन्नर माळेगांव येथील मोहन आरोटे यांच्यावर अन्न सुरक्षा मानके कायद्याचे २६(१),२६(२)(I) शिक्षा पात्र कलम ५९ व भादवि २७२,२७३ व ३२८ अंतर्गत पुढील तपासासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.