Mhada Lottery 2023 : मुंबईत आपले हक्काचे घर असावे अशी सर्वांची इच्छा असते. केवळ मुंबईतील (Mumbai) घरांच्या किमती पाहता येथे घर घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे घर मिळणे हे स्वप्न स्वप्नच राहून जातं. अशावेळी अनेकजन म्हाडाच्या लॉटरीवर अवलंबून राहतात. मात्र आता म्हाडाच्याच्या माध्यमातून अनेकांचे हक्काचे घर स्वस्त दरात मिळवण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण म्हाडाच्या (Mhada Lottery 2023 ) कोकण मंडळाने दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा नव्या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये डोंबिवलीतील रुणवाल समूहाचे 621 प्रकल्प, वसई, विरार, नवी मुंबई आणि ठाणे येथील 20 टक्के प्रकल्पांचा समावेश सर्वसमावेशक योजनेतील करण्यात येणार असून, 10 मे रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतील शिल्लक घरांचा दिवाळीतील सोडतील समावेश असणार आहे.
नवीन सोडत प्रक्रियेद्वारे कोकण मंडळातील 4 हजार 654 घरांना सोडत काढण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्याने अनेक इच्छुक सोडतीपासून दूर राहिले आहेत. त्यामुळेच या सोडतीसाठी फारच कमी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र ज्यांना अर्ज करता आला नाही किंवा ज्यांना मुंबई महानगर प्रदेशात हक्काचे घरे घ्यायची आहेत त्यांच्यासाठीच कोकण मंडळाने येत्या दिवाळीत सोडत काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्याधिकारी यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले.
डोंबिवलीजवळील कल्याण तालुक्यातील घारीवली आणि उसरगाव परिसरातील रुणवाल गटाच्या प्रकल्पात 621 घरे अत्यल्प आणि अल्प गटातील असणार आहे. या घरांचे क्षेत्रफळ 27 ते 43 चौरस मीटर म्हणजेच 290 ते 462 चौरस फूट आहे. तसेठ या घरांची किंमत लवकरच निश्चित केली जाईल आणि बाजारभावाच्या तुलनेत घरे एकप्रकारे स्वस्त होतील, असा दावा महामंडळाकडून करण्यात आला आहे.
म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करण्यात आला असून भ्रष्टाचाराल आव्या घालण्यासाठी सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. तर नव्या प्रक्रियेसह सोडत काढताना पुणे आणि कोकण मंडळाने अनामत रक्कमेत वाढ केली आहे. मात्र आता अनामत रक्कम वाढल्याने या0 दोन्ही मंडळाच्या सोडतीला कमी प्रतिसाद मिळाल्याची शक्यता व्यक्त आहे. दरम्यान या दोन्ही मंडळांनी अनामत रक्कम वाढवली. त्यावेळी मुंबई मंडळाने मात्र मुंबईतील घरांच्या सोडतीतील अत्यल्प आणि अल्प गटाच्या अनामत रक्कमेत कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे जाहीर केले. मात्र त्याच वेळी मध्यम आणि उच्च श्रेणीसाठी वाढ केली जाईल.