#MeToo: पुण्यातील महाविदयालयाच्या प्राध्यापकांवर विद्यार्थिनींचा गंभीर आरोप

बॉलिवूड, राजकीय आणि आता शैक्षणित क्षेत्रातही खळबळ

Updated: Oct 10, 2018, 11:57 AM IST
#MeToo: पुण्यातील महाविदयालयाच्या प्राध्यापकांवर विद्यार्थिनींचा गंभीर आरोप title=

पुणे : लैगिंक शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या #MeToo चळवळीचं लोण आता महाविद्यालयांपर्यंत पोहोचलं आहे. पुण्यातील  सिंबायसीस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन मधूनही लैंगिक शोषणाचा प्रकार पुढे आला आहे. याबाबत महाविद्यालयातील  विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर वाचा फोडली आहे. सिंबायोसिसमधील आजी माजी १० विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर तक्रारी मांडल्या असून काही विद्यार्थिनींनी प्राध्यापकांवरही आरोप केला आहे.

समाज माध्यमांवर होत असलेल्या तक्रारींची दखल घेत एससीएमसी प्रशासनाने फेसबूक पेज वर दिलगीरी व्यक्त करणारं पत्र  लिहून माफी मागितली आहे. तसेच याबाबत पुढे येऊन स्थापन केलेल्या समितीकडे तक्रार देण्याचही आवाहन केलं आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत बोलण्यासाठी पुढे येत आहेत. अनेक महिलांनी सोशल मीडिय़ावर आवाज उठवत अनेक मोठ्या चेहऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकरांवर अश्लिल वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडसह संपूर्ण भारतात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर सोशल मीडियावर #MeToo मोहिमेची सुरुवात झाली. बॉलिवूड, पत्रकारीता, राजकीय आणि आता शैक्षणिक क्षेत्रातूनही लैंगिक शोषणाचे आरोप सुरु झाले आहेत.