अनिरुद्ध दवळे, झी २४ तास, मेळघाट, अमरावती : मेळघाटातील वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून गाईड्स युनियनने अनोखी शक्कल लढवलेय. ठीक ठिकाणी खदखद मास्तर यांच्या वऱ्हाडी बोली भाषेतील फलक लावले आहेत. पोट्टे निसर्गाची मजा घ्याले मेळघाट जंगलात, चिखलदऱ्यात जाता.... दिसलं ते गपरगपर खाता..अन् लेकहो पंन्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, तिथच टाकून देता... काही बेवडे तर खतरनाकच आहे न भाऊ... अर्धी ढोसली का पावटी कुठही फेकून देतात. तुमचे उपद्रव मेळघाटच्या समृद्ध जंगलातील मुक्या प्राण्यांच्या जीवावर उठते न राजा... अशा लोकांले आपल्या विदर्भातले कराळे गुरुजी सांगून राह्यले कसं वागाचं ते... सीमांडोहमधील गाईड्स युनियन तुम्हांले हे मोठं मोठे फलक लावून देऊन रायली... जरा लक्ष द्या बे...
या मेळघाटचं रक्षण करणं आपली परतेकाची जबाबदारी आहे न तुम्हीच जर मेळघाट मंदी येऊन असा कचरा केला, दारू पिऊन गयाटा केला त ताल जमन का ? उद्या दुसऱ्या देशातले पर्यटक इथं आले त शिव्या घालन न आपल्याले... म्हनून स्वच्छता ठेवा म्हणजे आपल्या मेळघाट, चिखलदऱ्याच नाव मोठं होईन...
मेळघाट मंदी येणारे पर्यटन हे लय विदर्भातलेच आहे. म्हणून यायिले याच भाषेत समजून सांगा लागते. म्हनून गाईड्स युनियन भाऊ ही शक्कल लढवली.
आता आलं का लक्षात तुम्हाले आता कधी तुम्ही निसर्गाची मजा घ्याले मेळघाट ले गेले तर मजा चांगली घ्या. पण कचरा कुठं करू नका. नाही तर मग तुमच्यात अन् म्याटात काय फरक आहे? लक्षात ठेवजा बे पोट्टेहो...