अहमदनगर : देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमता सहभागी झालेल्यांकडून कोरोनाचा प्रसार झाला. यामुळे काही जणांना मृत्यूही झाला. याच धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेली २४ परदेशी नागरिक येथे आलेत. दरम्यान, जिल्ह्यात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. पर्यटन व्हिसावर अनेक परदेशी नागरिक राहत असल्याचे उघड झाले आहे. हे परदेशी नागरिक मरकजहून आल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.
BreakingNews । अहमदनगरमध्ये तबलिकी जमातीच्या मरकजहून आलेल्या २४ परदेशी नागरिकांना अटक । या परदेशी नागरिकांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या पाच स्थानिक नागरिकांवर गुन्हे दाखल
#Lockdown #Mumbai #Corona
@CMOMaharashtra #coronavirusindia @rajeshtope11@ashish_jadhao #COVID19— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 18, 2020
तबलिकी जमातीच्या मरकजहून आलेल्या २४ परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच या २४ परदेशी नागरिकांना मदत करणाऱ्या पाच स्थानिक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे आहेत. दरम्यान, हे २४ परदेशी नागरिक भारतात पर्यटन व्हिसा आले आहेत. मात्र, असे असताना या व्हिसाचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, मरकजहून आलेल्या या परदेशी नागरिकांच्या संपर्कात कोण कोण आले, याचीही माहिती घेण्यात येत आहे. तसेच स्थानिक पाच नागरिकांची चौकशीही करण्यात येत आहे. दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात मरकजहून दाखल झालेल्या या परदेशी नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे.