मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना छत्रपकी संभाजी नगर रुग्णालयात दाखल केले आहे. 

Updated: Nov 26, 2023, 07:53 AM IST
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल title=
Maratha activist Manoj Jarange Patil hospitalised in sambhajinagar

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महत्त्वाची बातमी समोर येतय. शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटलांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रात्रीच रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

मनोज जरांगे यांना अशक्तपणा जाणवत असल्यामुळं त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. तिथे दोन दिवस त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती समोर येतेय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सभा घेत आहेत. रात्रंदिवस जरांगे पाटील राज्यातील विविध कानाकोपऱ्यात जाऊन सभा घेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जरांगेंनी उपोषण सोडलं होतं. उपोषणादरम्यानही त्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहेत.आंदोलकांसोबत संवाद साधत असताना ते अचानक स्टेजवर कोसळले होते. त्यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जरांगे पाटील यांना दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार असून त्यानंतर सुटी देण्यात येणार आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करण्यासाठी 24 डिसेंबरची डेडलाइन दिली आहे. यासाठी अवघा एक महिना उरला असताना जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. दरम्यान सभेत जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार निशणा साधला आहे. राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली पेटू नयेत, यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. दिवस पुरत नाही म्हणून रात्रीही सभा आणि कार्यक्रम घेऊन लोकांशी संवाद साधत आहोत. मात्र, हे सरकार आमच्यावरच गुन्हे ठोकत आहे. दुसरीकडे छगन भुजबळ जातीय तेढ निर्माण होणारी वक्तव्यं करत आहे Replaceत. त्यांच्यावर कोणताही कारवाई होत नाही. मात्र, आमच्या सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले जातात. याचा अर्थ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीच छगन भुजबळ यांना पुढं घातलंय, असा घ्यायचा का? सरकारच छगन भुजबळांना पाठबळ देत आहे का? या माध्यमातून सरकारलाच जातीय दंगली भडकवयाच्या आहेत का, असा थेट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.