गावची शान! तीन शेतकरीपुत्र एकाच वेळी अग्निवीर; ढोलताशा, डीजे लावून गावभर मिरवणूक

agniveer news: आता अनेक तरूण मंडळी यात सहभागी होत आहेत. सध्या अशाच एका बातमीनं गावकऱ्यांच्या आनंदात (malakapur news) भर घातली आहे. 

Updated: Dec 1, 2022, 11:38 AM IST
गावची शान! तीन शेतकरीपुत्र एकाच वेळी अग्निवीर; ढोलताशा, डीजे लावून गावभर मिरवणूक title=

मयूर निकम, झी मीडिया, मलकापूर: मागच्या वर्षी पंतप्रधानांनी घोषित केलेल्या सैन्यभरतीच्या अग्निवीर (agniveer) योजनेवरून अनेक वादंग उठले होते. त्यामुळे गेले अनेक महिने त्यावरून वादंग उभा राहिला होता. अशातच आता अनेक तरूण मंडळी यात सहभागी होत आहेत. सध्या अशाच एका बातमीनं गावकऱ्यांच्या आनंदात (malakapur news) भर घातली आहे. त्यामुळे सध्या गावागावातून सैन्यभरतीसाठी अनेक तरूण मुलं नोंदणी करत असून त्यांचे सेलिक्शेनही होताना दिसते आहे. नुकतच मलकापूर तालुक्यातील जांभूलधाबा (jabuldhaba) या गावातील तीन शेतकरी पुत्र यांची (भव शिंबरे, वैभव मोरे, राहूल बिलावर) केंद्राची महत्त्वपुर्ण अशा अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय सैन्यदलात भरती झाली आहे. (malakapur news three youngsters got recruited for agniveer military villagers curates possession)
 
विशेष म्हणजे एकाच गावातील तीन युवकांची एकाच वेळी भरती झाल्याबद्दल गावातील तरुणांनी डीजे लावून गावभर मिरवणूक काढून फटाक्यांच्या (firecrakkers) आतिषबाजीत् पेढे वाटप करून आनंदत्सोव साजरा केलाय. जवळपास वर्षभरापासून जांबुळधाबा येथील युवकांनी नाडगाव ते जामाठी आणी परत जांबुळधाबा दोन ते अडीच तासामध्ये धावण्याची प्रक्टिक्स केली. या सैन्यभरतीसाठी अनेक दिवस ते कष्ट करत होते. स्वतःचे भाग्य देशाला अर्पण करणारे भारतीय सौनिक म्हणून मान मिळवला आहे. या यशाबद्दल तिन्ही युवकांनी आपले श्रेय आई-वडिल आपले शिक्षक (parents) मंडळींना दिले आहे. त्यांच्या यशाबद्दल गावभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा - cryptocurrency news: जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे फायदे-तोटे? एका क्लिकवर सर्व माहिती

मुलींसाठीही सैन्यभरती : 

मुलांप्रमाणे मुलीही कशातच कमी नाहीत. तेव्हा आता मुलींसाठीही सैन्यभरतीत अनेक संधी आहेत. अग्निवीर भरती योजनेवर सर्व वाद असतानाही देशभरात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात तरुणांची भरती सुरू झाली आहे. मुलींना या सैन्यभरती प्रवेश मिळवण्यासाठी मुदतीअंतर्गत नोंदणी करावी लागले. सर्वप्रथम joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर, होम पेजवर दिसणार्‍या लेटेस्ट रिक्रुटमेंट (recruitment) लिंकवर क्लिक करा. यावर्षी ऑगस्ट महिन्यात लष्करी पोलिसांच्या नोंदणीच्या शेवटची तारीख होती.