महावितरणचा शेतकऱ्यांना मोठा दणका; आताच सावध व्हा

शेतकऱ्यांना याबाबत सूचना 

Updated: Nov 18, 2021, 10:06 AM IST
महावितरणचा शेतकऱ्यांना मोठा दणका; आताच सावध व्हा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

पुणे : वीजबिल थकवणाऱ्यांना आता महावितरणकडून दणका देण्यात येण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत. महावितरण कडील थकबाकीदार शेतकऱ्यांनी आपले थकीत विजबिल भरुन सहकार्य करावे. अन्यथा 22 नोहेंबर पासून सर्व रोहित्राचा विद्युत पुरवठा (डीपी) बंद करण्यात येणार आहे. 

रोहित्रा वरील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रत्येक कनेक्शन धारकांनी वीज बिल भरून होणारी कारवाई थांबवावी, असे आवाहन करमाळा ग्रामीण येथील कनिष्ठ अभियंता कार्तिक वाघमारे यांनी केले आहे.

पोथरे (तालुका करमाळा) येथे वीज बिल वितरण आणि वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी त्यांनी ही बाब स्पष्ट केली. 

सध्या महावितरणने वीज बिल वसुली मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना याबाबत सूचना केल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

करमाळा तालुक्यात सध्या करमाळा, मांगी, पोटेगाव, पांडे, झरे, जातेगाव, जिंती, कोर्टी, आदी 13 उपकेंद्र आहेत. 

सदरील सर्व उपकेंद्रावर दोनशे कोटी हून अधिक शेती पंपाची थकबाकी असल्याने महावितरणने ही थकीत विजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे.

वीजबिल भरता येत नाही, मग शेती कशाला करता
वीजबिल भरता येत नाही, मग शेती कशाला करता? या शब्दांत महावितरणच्या अधिकाऱ्याने बळिराजाला खडे बोल सुनावले आहेत. 

एकिकडे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतीपिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचं अक्षरशः दिवाळं निघाले आहे

अशा परिस्थितीतच महावितरणने आता बळीराजाला वेठीस धरल्यामुळं त्यांच्यापुढे मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.