रिक्षाऐवजी ईव्हीएमवर आले हॅलिकॉप्टर चिन्ह

नाशिक देवळाली मतदारसंघात उमेदवाराचे चिन्ह बदलण्याचा धक्कादायक प्रकार उघड 

Updated: Oct 23, 2019, 05:23 PM IST
रिक्षाऐवजी ईव्हीएमवर आले हॅलिकॉप्टर चिन्ह title=

नाशिक : नाशिक देवळाली मतदारसंघात उमेदवाराचे चिन्ह बदलण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इथल्या मतदार संघात उभ्या असलेल्या उमेदवारास यामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. त्याला निवडणूक आयोगाने दिलेले चिन्ह आणि प्रत्यक्षात ईव्हीएमवर असलेले चिन्ह वेगळे असल्याने हा गोंधळ झाला आहे. रवी केशव बागुल असे या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. 

124 देवळाली विधानसभा मतदारसंघात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवळाली मतदार संघात अपक्ष उमेदवाराला रिक्षा हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले होते. त्याने हे चिन्ह घेऊन निवडणुकीचा जोरदार प्रचार केला. पण प्रत्यक्षात मतं देताना मात्र ईव्हीएमवर रिक्षा हे चिन्हचं नव्हतं. मतदान करायला गेलेल्या मतदारांना ईव्हीएम वर रिक्षाऐवजी हेलिकॉप्टर चिन्ह दिसत होते. 

यामुळे निवडणूक आयोगाचा अक्षम्य कारभारावर जोरदार टीका होत आहे.