Scholarship Result : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इतके'च विद्यार्थी झाले उत्तीर्ण

पाचवीच्या  एकूण 3, 82, 797 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 91,400 विद्यार्थी पात्र झाले. आठवीची परीक्षा 2,79,466 विद्यार्थ्यांनी दिली होती.  त्यापैकी 35,034 विद्यार्थी पात्र ठरले आहे.

Updated: Jan 4, 2023, 10:19 AM IST
Scholarship Result : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इतके'च विद्यार्थी झाले उत्तीर्ण title=

फेब्रुवारी 2022 मध्ये राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचे (Fifth and Eighth Class Scholarship Result ) अंतिम निकाल (Scholarship Result ) नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा हे निकाल समोर आले. यामध्ये इयत्ता पाचवीचे 23.90 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत, तर इयत्ता आठवीच्या 12.53 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.   

राज्यात इयत्ता पाचवीच्या  एकूण 3,82,797  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 91400 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. इयत्ता आठवीच्या 279466 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.  (Maharashtra Scholarship exam result class fifth and eight announced know details here)

त्यापैकी 35034 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. अर्ज छाननीनंतर अंतिम निकाल 7 नोव्हेंबरला पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम म्हणजे तात्पुरता निकाल जाहीर करण्यात आला होता. 

आणखी वाचा: Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या एका दिवसात दोन मोठ्या घोषणा; पुण्यात 5 हजार 966 घरांची जम्बो लॉटरी निघणार

ज्यानंतर 7 ते 17 नोव्हेंबर दरम्यान शाळांकडून गुण पडताळणीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. या प्रक्रियेनंतर अर्ज छाननी करून मंगळवारी अखेर अंतिम निकाल जाहीर केले गेले. 

कसा पाहाल निकाल 

विद्यार्थी लॉग इन आयडी वापरून परीक्षेचा निकाल पाहू शकतात. तर, पालकही http://www.mscepune.in  आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहू शकतात. 

कधी असते शिष्यवृत्तीची परीक्षा? 

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेतली जाते, त्यासाठी डिसेंबर महिन्यात अर्ज मागवले जातात. यंदा मात्र शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरणं शक्य झालं नाही 

आणखी वाचा: Mahavitaran Strike : कोयना आणि चंद्रपूर वीज केंद्रातील वीज निर्मिती बंद, वीज कर्मचारी संपाचा मोठा फटका

आणि म्हणूनच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. राज्यभरातील अनुसूचित जाती- जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. 

मध्यंतरी कोरोना काळात म्हणजेच 2019- 2021 मध्ये शाळा बंद होत्या पण शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरु होता या काळात विद्यार्थी आर्थिक अडचणीतही होते.  

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील 1700 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचं समोर आलं आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या दरम्यान होईल. इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांची वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. (Maharashtra Board exam)