मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का म्हणाले 'थप्पड से डर नही लगता प्यार से लगता है'

'थप्पड से डर नही लगता प्यार से डर लगता है' कोणाला म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Updated: Feb 12, 2022, 03:42 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का म्हणाले 'थप्पड से डर नही लगता प्यार से लगता है' title=

जालना : कोरोनावरून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना पोटदुखी आणि मळमळ होतेय अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी केली आहे. कोरोना काळात राज्य सरकारनं चांगलं काम करून अनेक रुग्णांना मृत्यूपासून वाचवलं, पण राज्य सरकारने केलेल्या कामाचं कौतुक अनेकांना परवडत नाही अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

ज्यांना कोरोनातील भ्रष्टाचार काढायचा त्यांनी काढावा, त्यांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही, आरोप करणाऱ्यांनी स्वतःचा ईलाज आरोग्य केंद्रात सरकारी दराने करून घ्यावा किंवा फुकटात करून देऊ, त्यांचा ईलाज करणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे असं सांग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

जालन्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून उदघाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे, मंत्री आदिती तटकरे या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. 

या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच उपस्थितांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं कौतुक केलं. कुणी माझं कौतुक केलं की मला धडधड होते असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सलमान खानच्या दबंग चित्रपटातला सोनाक्षी सिन्हा यांचा 'थप्पड से डर नही लगता साहब प्यार से डर लगता है हा डायलॉग' आठवला. पण हे कौतुक वेगळं असून थपडा देणं आणि थपडा खाणं हे आमचं आयुष्य असल्याचं सांगत कुणी माझं कौतुक केलं की मला धडधड होते असं सांगायला देखील मुख्यमंत्री विसरले नाहीत.