Maharashtra Budget 2023: अंगणवाडी सेविकांसाठी एक खुशखबर आहे. आज महाराष्ट्र राज्याचे (Anaganwadi in Maharashtra Budget) बजेट घोषित झाले आहे. हे बजेट शिंदे - फडणवीस सरकारातले पहिलेच (Shinde - Phandanvis Government) बजेट होते. त्यामुळे यंदा सगळ्यांचे विशेष लक्ष लागले होते. यावेळी महिला, तरूण पिढी, नोकरदारवर्ग आणि शेतकरी व महिला अशा महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रमुख घटकांना काय मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. महागाई सर्वत्र वाढत (Inflation) जाते आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशात काय पडले याविषयीही सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. यंदा अंगणवाडी सेविकांसाठीही (Anaganwadi Sevika) मोठी तरतुद करण्यात आली आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसातच अंगणवाडी सेविकांसाठी मोठी भरती करण्यात येणार आहे. यंदा एकूण 20 हजार रिक्त पदं (Recruitment) भरली जाणार आहेत. त्यासोबत अंगणावाडी सेविकांसाठी त्यांच्या मानधनात मोठी भर करण्यात आली आहे. (Maharashtra Budget 2023 anganwadi sevika will get additional salary from the state government know how to apply)
अंगणवाडीच्या आशा स्वयंसेविकांसाठी मोठी तरतूद केली आहे. यात हजार रूपयांची वाढ करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अंगणवाडी सेविकांच्या पगारात वाढ करण्यासाठी घोषणा केली आहे. त्यामुळे यासाठी आता मोठ्या प्रमाणात अंगणवाडी भरती होऊ शकते. अंगणवाडी सेविकांकडे अनेकदा दुर्लक्ष होते असे बोलले जाते परंतु गेल्या काही वर्षांपासून अंगणवाडी सेविकांसाठी मोठ्या प्रमाणात भरती करत त्यांच्या पगारातही वाढ करण्यासाठीचे प्रयत्नांना यश (Salary Increment Anaganwadi Sevika) येते आहे.
- आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली
महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अंगणवाडीत सेविकांसाठी मोठी भरती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात अंगणवाडींचीही संख्या वाढते आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातही मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा विषय चर्चिला जात होता. त्यामुळे सध्या मदतनीस आणि सेविका तसेच मिनी अंगणवाडी (Mini Anganwadi Sevika) सेविकांच्या मानधन वाढ करण्याचे सरकार ठरवले आहे. अंगणवाडीसाठी सेविकांना अर्ज (Anganwadi Sevika) करता येऊ शकतो. त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी तर आहेच पण यातून स्त्री सक्षमीकरणाचा मोठा फायदाही महिलांना मिळू शकतो.