महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के

 यंदा १२ वीचा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे.

शैलेश मुसळे | Updated: Jul 16, 2020, 12:32 PM IST
महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के  title=

पुणे : बारावीचा (HSC Result) निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के असून मुलांचा निकाल ८८.०४ टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. गेल्या वर्षी १२ वी चा निकाल ८५.८८ % लागला होता.

कोकण विभागाने (HSC Result 2020) निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९५.८९ इतका आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के इतका आहे.

राज्यातील १४ लाख १३ हजार ६८७ मुलांनी परीक्षा दिली असून १२ लाख ८१ हजार ७०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २३१८ महाविद्यालयांचा १०० टक्के निकाल असून ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी ४६४४ इतके आहेत.

- कला शाखा निकाल : ८२.६३ टक्के
- वाणिज्य शाखा निकाल : ९१.२७ टक्के
- विज्ञान शाखा निकाल : ९६.९३ टक्के
- MCVC : ९५.०७ टक्के

निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

www.mahresult.nic.in

www.maharashtraeducation.com 

www.hscresult.mkcl.org

महाराष्ट्रात यंदा १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. यंदा कोरोना संकटामुळे पेपर तपासणीची प्रक्रिया उशीरा झाल्याने निकाल ही उशिरा लागला आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.