मुक्ताईनगरच्या बंडखोर आमदाराचा शिवसेनेला पाठिंबा

मुक्ताईनगरचे शिवसेना बंडखोर आमदार चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला पाठिंबा

Updated: Oct 31, 2019, 08:56 PM IST
मुक्ताईनगरच्या बंडखोर आमदाराचा शिवसेनेला पाठिंबा  title=

मुंबई : मुक्ताईनगरचे शिवसेना बंडखोर आमदार चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेला एकूण ६ अपक्ष आमदारांचा पाठींबा मिळाला आहे. आता शिवसेनेचे संख्याबळ ६३ वर पोहोचले आहे. भाजपा आणि शिवेसेन साक्री विधनसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांनी काल शिवसेनेला पाठिंबा दिला. यानंतर शिवसेनेकडे अपक्षांचे संख्याबळ ६ वर गेले होते. 

मुख्यमंत्री कोणाचा होणार ? आणि जागावाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेना-भाजपामध्ये सध्या जुंपली आहे. समान जागावाटपावर शिवसेना ठाम आहे तर असा काही फॉर्मुला ठरला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत हातमिळवणी करण्याच्याही हालचाली दिसत आहेत. तर भाजपा-शिवसेनेचेच सरकार येणार यावर भाजपा नेते ठाम आहेत. या पार्श्वभुमीवर गृहमंत्री अमित शाह मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काय चर्चा होते यावर राज्यातील पुढचे राजकारण कसे वळण घेते हे ठरणार आहे.