रायगड : महाड MIDC तील कारखान्यात रात्रीच्या सुमारास स्फोट झाला आहे. स्फोटानंतर कारखान्याला भीषण आग लागली आहे. विनती ऑरगॅनिक कारखान्यात आग लागली आहे. अतिवृष्टीमुळे एमआयडीसीतील कारखाने बंद असताना आगीमुळे लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Mahad Flood : Another crisis followed by a catastrophic flood at Mahad, a massive explosion at a factory in MIDC)
महाडवर आधीच महापूराचं संकट असताना आता कारखान्याला भीषण आग लागल्यामुळे गावकरी घाबरले आहे.
आज पहाटे पुन्हा आणखी एका कंपनीत आग लागल्यामुळे एम आय डी सी चे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच महाडच्या तळीये गावात ३२ घरांवर कोसळली दरड, ७२ जण अडकले, एनडीआरएफची टीम तळीयेकडे रवाना झाली आहे.
चिपळूणपाठोपाठ महाड शहरही पाण्यात आहे. त्यामुळे हजारो लोकं अडकलेली आहेत. कोणताही संपर्क होत नसल्यानं जीव वाचवण्यासाठी छताचा सहारा या लोकांनी घेतला आहे. संध्याकाळपासून लोकं मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र संपर्क होत नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे दिली आहे.