अनिल अंबानी वॉक करत असलेल्या गोल्फ मैदानाला प्रशासनाने ठोकलं टाळं

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी हे लॉकडाऊन लागल्यापासून महाबळेश्वरातील त्यांच्या लाल बंगल्यावर वास्तव्याला आहेत.

Updated: May 3, 2021, 10:51 AM IST
अनिल अंबानी वॉक करत असलेल्या गोल्फ मैदानाला प्रशासनाने ठोकलं टाळं title=

सातारा : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी हे लॉकडाऊन लागल्यापासून महाबळेश्वरातील त्यांच्या लाल बंगल्यावर वास्तव्याला आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी अंबानी कुटुंब इव्हिनिंग वॉक आणि मॉर्निंग वॉकसाठी कायमच महाबळेश्वरातील रस्त्यावरती फिरताना अनेकांना दिसत असतात. अनिल अंबानी वॉक करताना दिसत असल्याने त्यांना पाहण्यासाठी देखील लोक त्यावेळेत घराबाहेर पडतात. तसेच अनिल अंबानी यांचा फोटो, व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करतात.

सध्या वाढत्या कोरोनामुळे राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन आहे.  सर्व पालिका क्षेत्रातील नियम कठोर करण्यात आलेयत. 

त्यात आता अनिल अंबानी आणि टीना अंबानी हे महाबळेश्वरातील गोल्फ या मैदानावर इव्हिनिंगसाठी आल्याचे एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या 'द क्लब' या संस्थेच्या सचिवांना नोटीस बजावली असून आता या गोल्फ मैदानाला टाळे ठोकण्यात आले आहे.