मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे सर्व आमदार एकत्र येऊन करणार शक्ति प्रदर्शन करणार आहेत. थोड्याच वेळात तीनही पक्षांचे आमदार आणि समर्थक पक्ष आणि अपक्ष आमदारही उपस्थित रहाणार आहेत. यावेळी महाआघाडीचे १६२ आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड होणार आहे. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हाँटेल मधील मुख्य हाँल मध्ये संध्याकाळी ७ वाजता होणार शक्तीप्रदर्शन होईल. महाविकास आघाडीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न या आमदारांकडून केला जाईल.
We are all one and together , watch our 162 together for the first time at grand Hyatt at 7 pm , come and watch yourself @maha_governor pic.twitter.com/hUSS4KoS7B
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 25, 2019
तीनही पक्षांचे आमदार वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आहेत. ही तिनही हॉटेल जवळच्या अंतरावर आहेत. पण यांना पक्षनेत्यां व्यतिरिक्त कोणाला भेटण्यास दिले जात नाही. दर दोन ते तीन दिवसामध्ये यांना हॉटेल बदलावे लागत आहेत. त्यामुळे आमदारांमध्येही तणाव आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. लवकर एकदा सरकार स्थापन व्हावे आणि आमची यातून सुटका व्हावी अशी आमदारांची इच्छा आहे.
सुप्रीम कोर्टातून फडणवीस सरकारला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्ट आता मंगळवारी सकाळी १०.३० वाजता निर्णय देणार आहे. सोमवारी कोर्टात जवळपास २ तास यावर दोन्ही पक्षाच्या वकिलांनी बाजू मांडली. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून २४ तासात बहुमतचाचणी घेण्याची मागणी करण्यात आली होती.
मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलं की, 'राज्यपालांनी फ्लोर टेस्टसाठी १४ दिवसाची वेळ दिली होती. त्यांनी म्हटलं की, प्रोटेम स्पीकरनंतर स्पीकरची निवड महत्त्वाची आहे. पण विरोधी पक्ष प्रोटेम स्पीकरकडूनच फ्लोर टेस्टसाठी आग्रही आहे. पुढच्या सात दिवसात फ्लोर टेस्ट नाही होऊ शकत. मंगळवारी देखील फ्लोर टेस्टचा आदेश देऊ नये.'