बुलडाणा : जगात सर्वात सुंदर भावना म्हणजे प्रेम. या प्रेमाच्या भावविश्वात रमत गप्पा करणार्या एका प्रेमी युगुलाची मुलीच्या कुटुंबीयांनी येथेच्छ धुलाई केली. ही घटना मंगळवारी नांदुरा बसस्थानकात घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमानुषपणे मारहाणीच्या प्रकारामूळे जीवनातील नीतिशास्त्राचे पारंपरिक पावित्र्य कसे जपावे?, असा प्रश्न निर्माण झाला असून घटनेची पोलिसात तक्रार नसल्याने कारवाई झाली नसल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
मुलीसह तिच्यासोबत बोलत नसलेल्या युवकालाही बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर मुलीकडील मंडळी तिला घेऊन निघून गेले. या घटनेचे बघ्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये चित्रिकरण केले. तर काहींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याप्रकरणी नांदुरा पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र प्रेमी युगलाला अमानुषपणे मारणे सामाजिकदृष्टीकोणातून कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.