कोण आहेत श्रीराम पाटील? फेब्रुवारीपर्यंत भाजप, एप्रिलमध्ये शरद पवार गट आणि आता रावेरमधून उमेदवारी

Loksabha Election 2024 : श्रीराम पाटील यांना उमेदवारी नेमकी कशी मिळाली. शरद पवार गटात येण्यामागचा त्यांचा मुख्य हेतू नेमका कोणता? पाहा सविस्तर वृत्त..   

सायली पाटील | Updated: Apr 11, 2024, 08:12 AM IST
कोण आहेत श्रीराम पाटील? फेब्रुवारीपर्यंत भाजप, एप्रिलमध्ये शरद पवार गट आणि आता रावेरमधून उमेदवारी title=
Loksabha Election 2024 raver constituency candidate shriram patil everything you need to know

Loksabha Election 2024 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या वातावरणाला दिवसागणिक नवं वळण मिळत असतानाच काही नवी नावं आता सातत्यानं प्रकाशात येताना दिसत आहेत. ही पक्षांतर करून विरोधी पक्षातूनच उमेदवारी मिळवणारी काही नावंही या वातावरणात प्रचंड चर्चेत आली आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे, श्रीराम पाटील यांचं. 

महाविकासआघाडीनं (MVA) जागावाटप जाहीर केल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये सातारा आणि रावेर मतदारसंघातील उमेदवारांची नावंही जाही करण्यात आली. जिथं (Satara) साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांच्या नावावर तिकीटासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं तिथं रावेरमध्ये मात्र पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या (Shriram Patil) श्रीराम पाटील यांच्या नावे तिकीट देण्यात आल्यामुळं राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीये. 

रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. श्रीराम पाटील हे जिल्ह्यात एक उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते रावेकर लोकसभा मतदारसंघात अग्रस्थानी असून, ते काही काळापूर्वी अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत असल्याचंही म्हलं गेलं. अजित पवारांचा दौरा लांबला आणि श्रीराम पाटील यांचा प्रवेशही. पुढे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि अखेर शरद पवार गटावर येऊन त्यांच्या या राजकीय प्रवेशाच्या प्रवासाला विराम मिळाला. श्रीराम पाटील हे मराठा समाजाचा चेहरा म्हणून रावेरमध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत. त्यामुळं शरद पवारांनी रावेरमध्ये अचूक नेम साधला अशी राजकीय चर्चा सध्या संपूर्ण रावेरसह राज्यातही पाहायला मिळत आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत राज्याच्या 'या' भागातील हवामान बिघडणार; गारपीटीसह वादळी पाऊस झोडपणार 

दरम्यान, तिथं रावेरमध्ये भाजपकडून (BJP) रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाले असून त्यांच्या प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वाच्या व्यक्तींची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघात आता लेवा विरुद्ध मराठा असा सामना पाहायला मिळणार आहे. 

असं असलं तरीही हे श्रीराम पाटील हे कोण आहेत, कोणत्या उद्देशाने ते राष्ट्रवादी पक्षात गेले आणि त्यांनी कशी उमेदवारी मिळवली हे सर्व जनतेला माहिती असून आधी भाजप, नंतर अजित पवार आणि आता  शरद पवार प्रवेश करणाऱ्या श्रीराम पाटील यांच्यावर निशाणा साधत तिकिटासाठी पक्ष बदलणे आमची वृत्ती नसल्याचे म्हणत रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटील यांच्यावर टीका केली आहे.