LokSabha Polling Dates in Maharastra : सर्वांना उत्सुकता लागलेल्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली अन् मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 18 व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. देशातील लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार असून 19 एप्रिलपासून मतदानाची सुरूवात होईल. देशभरात 4 जून रोजी मतमोजणी होणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक
देशभरात पहिल्या टप्प्यात 21 राज्यात निवडणुका होणार आहे. यामध्ये 102 जागेवर निवडणुका होतील. महाष्ट्रातल्या विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघाचा समावेश आहे. 19 एप्रिलला मतदान पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यात 89 जागेवर निवडणूक होणार असून महाष्ट्रातील 8 मतदारसंघात निवडणूक होणार आहेत. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी मतदार संघाचा समावेश आहे. 26 एप्रिल या मतदारसंघात मतदान होईल.
तिसऱ्या टप्प्यात12 राज्यातील 94 जागेवर निवडणूक रंगणार असून यामध्ये राज्यातील 11 मतदारसंघ आहेत. यामध्ये रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले यांचा समावेश आहे. 7 मे रोजी या मतदारसंघात मतदान होणार आहे.
चौथ्या टप्प्यात 10 राज्यातील 96 जागेवर निवडणूक होणार असून यामध्ये राज्यातील 11 मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होईल.
पाचव्या टप्प्यात 8 राज्यातील 49 जागेवर मतदान होणार आहे. 20 मे रोजी होणाऱ्या 13 मतदारसंघात म्हणजेच धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघात निवडणूक पार पडेल.
पहिला टप्पा - रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर (मतदान तारीख – 19 एप्रिल )
दुसरा टप्पा - बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी (मतदान तारीख – 26 एप्रिल)
तिसरा टप्पा - रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले (मतदान तारीख – 7 मे )
चौथा टप्पा - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (मतदान तारीख – 13 मे )
पाचवा टप्पा - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (मतदान तारीख – 20 मे)