'महाराष्ट्राचा महानालायक स्पर्धा घेतली तर...' भाजपकडून पुन्हा उद्धव ठाकरे टार्गेट

Chandrakant Bawankule:  महाराष्ट्रातील 14 कोटी नागरिकांच मत घेतल तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील, अशी टोकाची टीका बावनकुळे यांनी केली.

Updated: Apr 21, 2024, 06:34 AM IST
'महाराष्ट्राचा महानालायक स्पर्धा घेतली तर...' भाजपकडून पुन्हा उद्धव ठाकरे टार्गेट title=
Chandrakant Bawankule on Uddhav Thackeray

Chandrakant Bawankule: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर आता टोकाची टीका करायला सुरुवात केली आहे. ठाकरे आणि फडणवीस हा वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री, आदित्यला मुख्यमंत्री करण्याचे भाजपकडून सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला. तर उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाल्याचे फडणवीस म्हणाले. यावर आता दुसऱ्या फळीतील नेत्यांकडूनही प्रत्युत्तर येऊ लागले आहे. 

देवेंद्र फडणवीस नालायक आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही टोकाची टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील 14 कोटी नागरिकांच मत घेतल तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील, अशी टोकाची टीका बावनकुळे यांनी केली. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरचं साधुसंतांच हत्याकांड बघितलं तेव्हा ते चूप राहिले, ज्यांनी कोविड काळात 100 कोटीचा भ्रष्टाचार केला, अडीच वर्ष पेन नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्रने बघितला, ते काय देवेंद्र फडणसांना नालायक शब्द बोलत आहे? असा प्रश्न बावनकुळेंनी विचारला. 

'काय लायकी...' संजय राऊतांना नवनीत राणांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्रातील जनता यांना माफ करणार नाही. उद्धव ठाकरे पिसाळलेले आहेत.  मोदीजींचा फोटो लावून 18 खासदार मागच्या वेळी निवडून आलो, हे उद्धव ठाकरेला माहिती आहे. आता मोदींचा फोटो गेला मोदींचं नावही गेलं. त्यामुळे त्यांचे अठरा खासदार दोन-चार वर येईल. म्हणून उद्धव ठाकरे यांनी वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये आहेत. अतिशय निराश अवस्थेमध्ये त्यांच्या मनावर परिणाम झालाय. त्या परिणामामुळे ते बोलत आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

IPL मधून शिका गुंतवणुकीचे 5 धडे! विराटचे चौके आणि रोहितच्या सिक्सरप्रमाणे बरसतील पैसे

यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून काय उत्तर दिलं जातंय, हे पाहणं महत्वाच ठरेल.

संदीपान भुमरेंना तिकीट दिल्यामुळे नाराज विनोद पाटलांचे सनसनाटी आरोप