शिरुर : शिरुरमध्ये शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांना फायदा होणार आहे. येथे राष्ट्रवादीच्या एकोप्याचा अभाव आहे. शिवाजीराव आढळरावांच्या विरोधात सक्षम उमेदवार नाही. त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांची प्रतिमा जपण्यात आढळराव यशस्वी झाले आहेत. शिरुरमध्ये २९ एप्रिलला निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीने येथे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
शिवाजीराव आढळराव पाटील | भाजप | 643415 |
देवदत्त निकम | काँग्रेस | 341601 |
अशोकराव खांडेभराड | मनसे | 36448 |
सरजेराव वाघमारे | बसपा | 19783 |
सोपानराव निकम | आप | 16663 |