VIDEO : कोल्हापुरात सीईओ, मुख्य लेखा अधिकाऱ्याला मारहाण

पोलीस-आयएएस अधिकाऱ्यांनाही विकत घेऊ, टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी समोर

Updated: Apr 10, 2019, 01:24 PM IST
VIDEO : कोल्हापुरात सीईओ, मुख्य लेखा अधिकाऱ्याला मारहाण  title=

कोल्हापूर : कोल्हापुरात काल प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षकावर माजी उपमहापौराच्या पतीनं बंदुक रोखल्यानंतर आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य लेखा आणि वित्त अधिकाऱ्यास किणी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांकडून मारहाण झालीय. अमन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल कदम यांना मारहाण झालीय. आम्ही पोलीस आणि आएएस अधिकाऱ्यांना विकत घेवू शकतो, असा दमदेखील टोलच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना भरला.

लोकसभा निवडणुकीचं कामकाज आटोपून कोल्हापूरला परत येताना रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलंय.