Maharashtra Breaking News LIVE: महाविकास आघाडीचे स्टेरिंग जयंत पाटील यांच्या हाती

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली असली तर शनिवारी लागणाऱ्या निवडणुकांच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. याचप्रमाणे दिवसभरातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचे संक्षिप्त अपडेट्स तुम्हाला येथे जाणून घेता येतील...

Maharashtra Breaking News LIVE:  महाविकास आघाडीचे स्टेरिंग जयंत पाटील यांच्या हाती

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा. कानाकोपऱ्यातील प्रत्येक बातमी एका क्लिकवर. 

 

21 Nov 2024, 11:11 वाजता

मनसे नेते संदीप देशपांनी मोठं विधान केलंय

उद्धव ठाकरे आणि शिंदेंची छुपी युती होती का ? 
मनसेला हरवण्यासाठी ठाकरे शिंदेंची छुपी युती आहे का?
वरळीत मनसेला हरवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदेंचं संगनमत- संदीप देशपांडे
मतदानासाठी उदासिनता का  हे सर्व राजकीय पक्षांनी समजायला हवं असंही देशपांडे म्हणालेत..
वाढलेल्या मतांचा फायदा भाजपलाच का ? मनसेलाही होऊ शकतो असंही संदीप देशपांडे म्हणालेत

21 Nov 2024, 11:08 वाजता

महाविकास आघाडीची आज बैठक

महाविकास आघाडीची आज बैठक आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल मतदान पार पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी निकालाआधी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करणार असल्याच सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात काल झालेल्या मतदानानंतर आणि परवा होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने निकालानंतरची रणनीती ठरण्यासाठी महाविकास आघाडीत खलबतं होणार आहेत. 

21 Nov 2024, 10:38 वाजता

अदानींविरोधात ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करु

 संजय राऊतांनी सांगितले की, "आजच अमेरिकेत अदानींविरोधात अरेस्ट वॉरंट निघालं आहे. आम्ही सांगतो ना अदानींने महाराष्ट्र विकायला काढला आहे. सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनाने अदानीविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. टेंडर मिळवण्यासाठी 350 मिलियनची लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात धारावी, विमानतळ आणि इतर अनेक महत्त्वाची टेंडर आहेत. यामध्ये गौतम अदानींनं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदींशी संगनमत करुन या सगळ्या जागा आणि टेंडर बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करु या विषयावर म्हणून आम्हाला पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा टाकण्यात आला आहे," असा आरोप केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

 

21 Nov 2024, 10:36 वाजता

हसन मुश्रीफ कार्यकर्त्यांचा जल्लोष

हसन मुश्रीफ देखील कार्यकर्त्यांसोबत जल्लोष करत होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मुश्रीफ समर्थकांनी जल्लोष साजरा केला. कागलमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ आणि शरद पवार राष्ट्रवादीचे समरजीत घाटगे याचात टक्कर पाहायला मिळत आहे. जल्लोष सुरू असताना हसन मुश्रीफ यांनी उडवली कॉलर,मुश्रीफ यांनी दंडही थोपटले.

21 Nov 2024, 10:01 वाजता

मविआ 23 तारखेला सत्तास्थापनेचा दावा करणार - संजय राऊत 
मविआच्या 160-165 जागा येणार - संजय राऊत 
अमेरिकेत अदानींविरोधात वॉरंट - संजय राऊत 

21 Nov 2024, 09:17 वाजता

20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींसाठी मतदान झालं. यानंतर सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागून राहिलं आहे. या दरम्यान दीपक केसरकर यांनी सूचक विधान केलं आहे. दीपक केसरकर म्हणाले की, वेळ पडल्यास अपक्षांना सोबत घेऊ. तसेच 20-22 अपक्ष आणि इतर उमेदवार निवडून येण्याचा अंदाज दीपक केसकरांनी वर्तवला आहे. अपक्ष आमदारांसोबत चर्चा करू शकतो असं देखील केसरकर यावेळी म्हणाले. 

21 Nov 2024, 09:08 वाजता

राज्यात किमान तापमानात चांगलीच घट 

उत्तरेकडील थंड वा-याचा प्रवाह वाढल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा 12 अंशाखाली घसरला. मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावं लागत आहे. तर  पुण्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. 12 अंश सेल्सिअस तापमान नोंदल गेलंय. पुढच्या आठवडाभरात किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

21 Nov 2024, 09:04 वाजता

राज्यातल्या मतदान टक्केवारीत यावेळी सर्वाधिक कमी मतदानाची नोंद ही मुंबईत झाली आहे. मुंबई शहरात एकूण 52.07 टक्के मतदान झालं. तर मुंबई उपनगरात एकूण 55.77 टक्के मतदान झालं.मुंबईत सर्वाधिक मतदान  हे भांडुप पश्चिममध्ये झालं. तिथल्या मतदानाची टक्केवारी ही 61.12 टक्के नोंदवण्यात आली आहे. तर मुंबईत सर्वात कमी कुलाब्यात मतदान झालंय. 44.49 टक्के मतदान कुलाब्यात झालं आहे. 

21 Nov 2024, 09:03 वाजता

मुंबईत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. पालघरमध्ये 60 मतदान झाल्याची नोंद झाली. तर ठाण्यात 56 टक्के मतदान झाल आहे. मात्र मुंबईत केवळ 50.73 टक्के मतदान झालं आहे. 

21 Nov 2024, 09:01 वाजता

काँग्रेस दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजपा क्रमांक एकचा तर काँग्रेस क्रमांक दोनचा पक्ष असेल असा अंदाज आहे. काँग्रेसला ५० हून अधिक जागा मिळण्याची शक्याता आहे.