Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सोलापुरात जाहीर सभेतील भाषणापूर्वी ओवेसींना पोलिसांकडून नोटीस

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभेच्या मतदानासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. राज्यात विविध मुद्द्यांवरुन वातावरण तापलं आहे. राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या. 

Maharashtra Breaking News Today LIVE Updates:  सोलापुरात जाहीर सभेतील भाषणापूर्वी ओवेसींना पोलिसांकडून नोटीस

13 Nov 2024, 08:17 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभेसाठी काँग्रेसची रणनीती, देशातील तीन मोठे नेते महायुतीला घेरणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यासाठी काँग्रेसची विशेष रणनीती. काँग्रेसचे देशातील तीन मोठे नेते महायुतीला घेरणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वेगवेगळ्या मुद्यावरून राज्यातील महायुतीला घेरणार, अशी सूत्रांची माहिती आहे. 

13 Nov 2024, 08:16 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाबाबत आज सुनावणी  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी होणार आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती सुर्यकांत आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर होईल. हे खंडपीठ दुपारी १ वाजेपर्यंत बसणार आहे. 

13 Nov 2024, 08:15 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पुण्यात अचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यातील रक्तपेढ्यामधील रक्तसाठा कमी असल्याने रक्त टंचाईचे सावट पुण्यात निर्माण झाले आहे. केवळ 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच रक्त साठा शिल्लक आहे. दिवाळी सुट्टी आणि विधानसभा निवडणुकीमुळे रक्तदान शिबिरे कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण होतो आहे.

13 Nov 2024, 08:13 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पुण्यात अचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यातील खडकवासला मतदारसंघात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस SP पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी  भरारी पथकाने कारवाई केली आहे. 

13 Nov 2024, 08:12 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज ठाकरेंची आज पुन्हा वरळीत सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा वरळीत सभा घेत आहेत. संदीप देशपांडे हे वरळीतून उभे आहेत. संध्याकाळी 6 वाजता जांबोरी मैदान येथे ही सभा होत आहे. 

13 Nov 2024, 08:11 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदनिका लॉटरी योजनेला मुदतवाढ

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदनिका लॉटरी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी वेळ लागत असल्याने ही मुदत वाढ देण्यात आलीय

13 Nov 2024, 08:09 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : अमित शहा यांची आज जाहीर सभा 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून  चाळीसगाव मतदार संघातील महायुती भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची चाळीसगावमध्ये जाहीर सभा, चारच दिवसात आमित शहा दुसऱ्यांदा जळगावमध्ये आहेत.

13 Nov 2024, 08:09 वाजता

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची सभा

आज उद्धव ठाकरे यांच्या तीन सभा कोकणात होत आहेत. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे ठाकरेंच्या सभा होणार आहेत. कणकवली आणि कुडाळ येथे नितेश राणे आणि निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राणेंबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार या कडे लक्ष?