Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 17 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

17 Oct 2024, 22:16 वाजता

उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद 

 

MVA Press conference : उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.. शिवालयात दुपारी 12 वाजता दरम्यान पत्रकार परिषद होणार असून यामध्ये जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.. तर मविआत कोण किती जागा लढणार याचा फॉर्म्यूला सुद्धा उद्याच जाहीर होण्याची शक्यता आहे.. या पत्रकार परिषदेला नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊत उपस्थित राहणार आहे...

17 Oct 2024, 21:15 वाजता

मविआचं शिष्टमंडळ उद्या निवडणूक आयोगात जाणार

 

MVA Meet Election commission : महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ उद्या निवडणूक आयोगाची भेट घेणार....सकाळी 11 वाजता हे शिष्टमंडळ भेटेल...आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारने घेतलेले निर्णय,तसंच विविध महामंडळावरी नियुक्ती याविषयी निवेदन दिले जाणार

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Oct 2024, 20:34 वाजता

उद्धव ठाकरे आमदारांना AB फॉर्म देणार?

 

Uddhav Thackeray : मविआचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाही.. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरे आपल्या पक्षातल्या आमदारांना AB फॉर्म वाटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये विद्यमान आमदारांना एबी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 15 विद्यमान आमदार आहेत त्यातील बहुतांश आमदारांचे या विधानसभा निवडणुकीचे तिकीट निश्चित मानले जातंय..विद्यमान आमदारांना उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणारेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Oct 2024, 19:51 वाजता

जे.पी. नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर

 

J. P. Nadda : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. धार्मिक संस्थांच्या विश्वस्तांसोबत आणि ट्रस्टींसोबत नड्डा संवाद साधणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री आणि प्रभारी भूपेंद्र यादव हे देखील उपस्थित राहणार आहेत. उद्या दुपारी 3.45 वाजता विलेपार्लेच्या पाटीदार हॉलमध्ये हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

17 Oct 2024, 19:11 वाजता

मविआचा 260 जागांचा तिढा सुटला-सूत्र

 

Mahavikas Aghadi Seat Sharing : 260 जागांवर महाविकास आघाडीतील तिढा सुटला-सुत्रांची माहिती...20 ते 25 जागांवर तिढा कायम, या जागांवर तिन्ही पक्षांचा दावा- सूत्र

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Oct 2024, 18:11 वाजता

'मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न',आदित्य ठाकरेंचा महायुतीवर आरोप

 

Aditya Thakare vs Ashish shelar : अदानीच्या घशात मुंबई घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी बुधवारी केला होता...त्याला आशीष शेलारांनी प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय...त्याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Oct 2024, 17:35 वाजता

नाशिक जिल्हा रुग्णालयातील 8 जण निलंबित, कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका

 

Nashik District Hospital Updated : नाशिक जिल्हा रुग्णालयातील बाळाच्या आदलाबदली प्रकरणानं वेगळंच वळण घेतलंय.. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने बाळांची आदलाबदल झालीच नसल्याचा अहवाल दिलाय..रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बाळाचा रिपोर्ट तयार करताना फीमेल ऐवजी मेल असं लिहून पुढे रिपोर्ट तयार केला आणि त्यामुळे सगळा गोंधळ झाल्याची माहिती समितीनं दिलीये. अहवालात सीसीटीव्हीच्या आधारे केलेल्या तपासणीचाही उल्लेख करण्यात आलाय.. दरम्यान या प्रकरणी कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत रुग्णालयातील 8 कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय.. यात 4 मुख्य डॉक्टर 3 शिकाऊ डॉक्टर आणि एका परिचारिकेचा समावेश आहे.. तसंच यात आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Oct 2024, 17:05 वाजता

उद्या भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार?

 

BJP : भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता...पहिल्या यादीत नाव अपेक्षित असलेल्या उमेदवारांना प्रदेश कार्यालयाकडून सूचना-सूत्र...यादी जाहीर होण्याआधीच उमेदवारांना निवडणुकीसाठी कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना-सूत्र...भाजपच्या पहिल्या यादीत १०० पेक्षा अधिक जणांचा समावेश असण्याची शक्यता-सूत्र

17 Oct 2024, 16:41 वाजता

रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठा बदल

 

Railway Reservation Rule Changed : रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात मोठे बदल करण्यात आलेत.. रेल्वे तिकीट बुकींगचा कालावधी कमी करण्यात आलाय.. पूर्वी प्रवाशांना चार महिने आधी रेल्वेचं तिकीट बुक करता याययचं मात्र आता हा कालावधी घटवून केवळ 2 महिन्यांचा करण्यात आलाय. त्यामुळे प्रवाशांना केवळ 2 महिने आधीच रेल्वेचं तिकीट बुक करता येणार आहे.. 1 नोव्हेंबरपासून हा नवा नियम लागू होणार आहे. दरम्यान ज्यांनी आतापर्यंत बुकिंग केलंय त्यांचं आरक्षण मात्र कायम राहणार आहे... शिवाय प्रवासी 31 ऑक्टोबरपर्यंत प्रवासी 120 दिवसांच्या आत आरक्षण करु शकतील.. त्यानंतर मात्र नवा नियम लागू होईल... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Oct 2024, 16:15 वाजता

इम्तियाज जलील पोटनिवडणूक लढवणार?

 

Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील नांदेड मधून लोकसभा पोट निवडणूक लढण्याचा तयारीत...अंतिम निर्णय असद ओवेसी घेणार...कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आमची तयारी सुरू आहे, इम्तियाज जलील यांची माहिती

बातमीचा व्हिडीओ पाहा-